मागच्या आठवड्यात आम्हाला लोणावळ्याला जायचे होते माझ्या मैत्रिणीने मला संध्याकाळी ४ वाजता फोन केला वृषाली मी कोणता ड्रेस घालू तू काय घालणार आहेस ? मी हाय हिलचे सॅन्डल घालू कि नॉर्मल चप्पल ? मग माझ्या अनुभवाने मी तिला सल्ला दिला. खर तर " मी काय घालू " हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्यात आपण जरा बरे दिसावे हे बायका काय आणि पुरुष काय सगळ्यांनाच वाटते. आणि आजकाळ सोशल मीडिया चा जमाना आहे. आपले फोटो कसे चांगले येतील आणि त्याला किती लाईक आणि कंमेंट येतील याकडे पण सगळ्यानाचे लक्ष असते. मी कुणी स्टायलिस्ट नाही पण कुठे कोणते कपडे घालायचे याचे थोडेफार कळते. मी पलाझो वर स्पोर्ट्सशूज घातलेल्या मुली पहिल्या आहेत. तसेच शॉर्ट्स घालून भाजी आणायला आलेल्या मुली पण पहिल्या आहेत. आणि जिम ला येताना नाईटड्रेस घालून आलेल्या मुली पण पहिल्या आहेत. यांच्याकडे पाहून वाटले कि यांना कुठे कोणते कपडे घालावेत हे कळत नाही का? माझ्या निरीक्षणांमधून आणि वेगवेळ्या मासिकामध्ये वाचून कुठे कोणते कपडे घालावेत याबद्दल लिहीत आहे. तुम्हाला योग्य वाटल्यास कळवा.
कपडयांची
निवड-
ऑफिस
वेअर -
जर तुम्ही कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम
करत असाल तर वेस्टर्न
लुक चे कपडे निवडा.
पण हे कपडे निवडताना
आपल्या शरीराचा आकार लक्षात घ्या.
बारीक लोकांना सगळेच कपडे शोभून दिसतात
पण स्थूल लोकांना कपडे निवडताना काळजी
घ्यावी लागते. फार सैल कपडे
घालू नका तसेच फार
घट्ट पण कपडे घालू
नका. काम करताना आपल्या
कपड्याकडेच सतत पाहावे लागत
असेल तर असे कपडे
वापरने टाळा. चुरगळलेले कपडे घालून कामाला जाऊ नका. इस्त्री केलेले नीटनेटके
कपडे घाला. वेगवेगळ्या
ऑनलाईन स्टोर ऑफिसवेअर उपलभद्ध आहेत तिकडून तुम्ही
ते खरेदी करू शकता. जर
तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल
तर कॉटनच्या साड्या, पंजाबी ड्रेस, लॉन्ग कुर्तीची निवड करू शकता.
पिकनिक
-
जर तुम्ही मित्र मैत्रिणीबरोबर फिरायला जाणार आहेत तर जीन्स
हा एक उत्तम पर्याय
आहे. तुम्हाला आवडत असतील तर
वेगवेगळे शॉर्ट जॅकेट्स तुम्ही टॉप वर घालू
शकता. पलाझो हा पण पर्याय
आहे काहीजणींना शॉर्टटॉप घालायला आवडत नाहीत त्या
लॉन्ग टॉप घालू शकता.
यातही पिकनिक चे ठिकाण आणि
ऋतू कुठला आहे यावर कपडे
निवडावे पावसाळ्यात पलाझो घालून गेला तर रस्त्यावरील
चिखलात भिजून निघेल.
लग्नकार्य
समारंभ -
कुठलाही
कार्यक्रम ठरला कि बायकांची
आणि मुलींची एका विषयावर चर्चा
सुरु होते, कोणते कपडे घालायचे ? हल्ली
त्यात थिम बेस कार्यक्रम
असतात. सगळ्या लोकांसाठी कपडे कोणते घालायचे
ठरवले जाते. त्यात काही ऍक्टिव्ह लोकांकडे
हे काम आपसूक येते.
जर जवळच्या नात्यामधील लग्न असेल तर
साडी हा सर्वोत्तम पर्याय
आहे. त्यात पण बनारसी सिल्क
साड्या उठून दिसतात. दागिने
निवडताना काळजीपूर्वक निवडावे. असतील नसतील तेवढे सगळे दागिने घालून
कार्यक्रमाला जाऊ नये, ते
फार चांगले दिसत नाही आणि
एवढे दागिने घातल्याने मोठा सोनेरी सापच
गळ्याभोवती टाकलाय असे दिसते. कारण
ते सगळे दागिने एकमेकांमध्ये
अडकून बसतात. एक मोजका नीट
दागिना घातला तरी छान दिसतो.
जर छोटा समारंभ असेल
तर वनपीस घालावेत ते जास्त छान
पण दिसतात आणि पटकन तयार
व्हायला सोपे जाते. वनपीस
वर शकत्यो सोन्याचे दागिने जात नाहीत तुम्ही
सोन्याचे दागिने घालणार असाल तर छोटे
दागिने घाला. आजकाल मार्केट मध्ये आर्टिफिशिअल ज्वेलरी मिळते ती वापरू शकता.
घरगुती
पूजा हळदीकुंकू -
हळदीकुंकू
घरगुती पूजेसाठी काठपदरची साडी किंवा आवडत
असल्यास नऊवारी साडी घालू शकता.
पारंपरिक दागिने आणि गजरा घातला
कि ती गृहिणी परिपूर्ण
दिसते.
परदेश
वारी -
जेव्हा
तुम्ही देशाबाहेर प्रवासाला निघता त्यावेळेला त्या देशामध्ये कसे
वातावरण असेल हे आधीच
इंटरनेट वर पाहून ठेवावे.
बरेचदा यूरोपीय देशामध्ये थंडी असते, त्या
वेळेस तुम्ही थर्मलवेअर आणि मोठे जाड
जॅकेट्स आपल्याकडूनच घेऊन
जा. नाहीतर एअरपोर्ट ला उतरल्यावर आधी
जॅकेट्स विकत घ्यायला जावे
लागेल. आपले कपडे तिकडे
फार चालत नाहीत घातले
तरी त्यावर ओव्हरकोट घालावे लागतात. हँडग्लोव्हज टोपी पण जवळ
ठेवा.जास्त कपडे नेऊ नका
कारण काही घातले तरी
त्यावर जॅकेट घालावेच लागते. परदेशात
साडी घालून फक्त हिंदी सिनेमातल्या
हिरोईनच वावरू शकतात आपण नाही.
हे सगळे घालताना आपल्याला
काय चांगले दिसते कुठल्या कपड्यामध्ये आपल्याला आरामदायक वाटते हे महत्वाचे आहे.
या लेखामधील चित्रे प्रतिनिधीक
स्वरूपाची आहेत आणि इंटरनेट
वरून घेतलेली आहेत.
No comments:
Post a Comment