खूप दिवसापासून मराठी लिखाण सुरू करायचे मनात होते. रोज मनात कितीतरी विचार गोष्टी येतात कुठे तरी या साठवायला पाहिजेत असे वाटत होते. माझी मैत्रीण बालिका पवार पण मला vru लिही लिही सांगतच होती पण मी मित्रमैत्रिणींच्या शुभेछया फक्त ग्रुप वर लिहून पाठवल्या होत्या. मला श्रीपाद ब्रह्मे ( डेप्युटी न्युज एडिटर , महाराष्ट टाइम्स) ज्यांचा स्वतःचा ब्रह्मेवाक्य हा फेमस ब्लॉग आहे त्यांनी वृषाली स्वतःचा एक ब्लॉग सुरु कर असा सल्ला दिला, माझे मिस्टर साईनाथ पण म्हणाले तू ब्लॉग लिही आणि मग मी तो अमलात आणायचा ठरवले. आतापर्यत १-२ लेख लोकप्रभा ला छापून आलेत एवढाच काय तो मला लेखनाचा अनुभव आहे.
या सगळ्यांच्या म्हणण्यामुळे मी हा ब्लॉग सुरु करतेय "सहज सुचले म्हणून ..... " कारण यात मला काय सुचेल हे सांगता येणार नाही :) वाचकांनी कुठलाही विषय वाचायची तयारी ठेवावी.
२०१३ सालापासून मी थोडा फार प्रवास केलाय त्या विषयी लिहिणार आहे. मला स्वयंपाकाची थोडीफार आवड आहे त्याबद्दल लिहिलं. मला माणसे वाचायला आवडतात खूप त्यांच्याबद्दल लिहिलं. तुम्हाला नक्की काय आवडते आहे ते मला जरूर कळवा.
मी फार मोठी लेखिका नाही माझे मराठी व्याकरण पण फार चांगले नाही
तरी चूक भूल देणे घेणे
वृषाली दंडवते
माझा ई-मेल - vrushalidandawate@gmail.com